Kalidas Kala Kalamahotsav 2023
भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्था संचलित जे. के अकडेमी ऑफ आर्ट अँड डिझाईन, वडाळा येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या MFA व BFA या कला शाखेतील विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या विविध कलाकृतींचे प्रदर्शन करणाऱ्या कालिदास कला महोत्सव 2023 चे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी, शुभांगी भुजबळ, कला दिग्दर्शक श्री रवींद्र बुगडे आणि डॉ. गणेश तरतरे यांच्या हस्ते दिनांक ९ मार्च रोजी महाविद्यालयाच्या भव्य स्टुडिओ मध्ये करण्यात आले.
या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या समारंभात कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी सजगपणे जगाकडे पाहण्याची निकड आणि त्यासाठी दर्जेदार साहित्याचे वाचन ,तसेच चित्रपट पाहणे गरजेचे असल्याचे मत पाहुण्यांनी व्यक्त केले.
या प्रदर्शनात मांडलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्वोत्तम कलाकृतींना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.
हे प्रदर्शन आयोजित करण्यामागे संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री जे.के. जाधव, प्राचार्य श्री सुरेंद्र जगताप, प्राध्यापक श्री गणपत भडके, सौ पूजा तिखे, श्री सिद्धांत कोंडे आणि श्री विक्रांत सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच जगताप मॅडम, सिद्धी सावंत, बाळा निर्मळ,सुनील वाघ यांचे सुद्धा या कार्यक्रमांत सहकार्य लाभले.
हे प्रदर्शन दिनांक ९ ते१२ मार्च पर्यंत खुले असून कला प्रेमींनी त्याचा आस्वाद घ्यावा, अशी विनंती संयोजकांनी केली आहे.